मुंबई, कोकणात जोरदार पाऊस

शनिवार, 25 जून 2016 (17:22 IST)
येत्या 24 तासात मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल, अशा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
शुक्रवारी सकाळी 8 ते आज पहाटे वाजेपर्यंत मुंबई शहरात 73 मिमी, पश्चिम उपनगरात 74.43 मिमी, तर पूर्व उपनगरात 107.79 मिमी पावसाची नोंद झाली. मान्सूननं मुंबईत उशिरा एन्ट्री केली असली तरी आता त्यानं चांगलाच जोर धरला आहे. काल दुपारी मुंबईत पाऊस बरसताच पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरूणांनी मरिन ड्राइव्ह, वरळी सी फेस आणि गेटवे कडे धाव घेतल्याचं पाहायला मिळालं. तरुणांनी या पावसाचा चांगलाच आनंद लुटला. अंधेरी, पवई, जोगेश्वरी मध्ये जोरदार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पाणी साचल्याचं मुंबईकरांची चांगलीच कसरत झाली. ठाणे आणि नवी मुंबईतही संततधार सुरुच होती.  

वेबदुनिया वर वाचा