महाराष्ट्राची चार राज्ये करा : मा. गो. वैद्य

बुधवार, 23 मार्च 2016 (08:52 IST)
महाराष्ट्राची दोन नाही, तर चार राज्ये व्हावीत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते  मा. गो. वैद्य यांनी केली असून त्यावरून नवे वादळ उठण्याची शक्यता आहे. वैद्य यांनी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याच्या पाश्र्वभूमीवर बोलताना ही मागणी केली.
 
स्वतंत्र विदर्भ राज्याचे अनेकदा समर्थन करणारे श्रीहरी अणे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र राज्य व्हावे, असे विधान करून गोत्यात आले. यावरून सरकारची कोंडी झाल्याने अणे यांना राजीनामा द्यावा लागला.
 
राज यांचा संघ व भाजपवर हल्ला
‘अणे यांचा बोलविता धनी रा.स्व.संघ आणि भाजप आहे. राज्य तोडण्याचे काम  अणेंपेक्षा तेच जास्त करत आहेत. ही त्यांच्याच म नातील इच्छा आहे, अणे निमित्तमात्र आहेत’, अशी तोफ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डागली. अणे अधिवेशनाच्या काळातच कसे बोलतात? असा प्रश्न उपस्थित करताना म हाराष्ट्र तोडण्याची भाषा यापुढे कुणी केल्यास कानङ्खटवून काढू, असा इशारा राज यांनी दिला. 

वेबदुनिया वर वाचा