त्यांनी पुण्यातील लॉ कॉलेज रस्ता येथील राज महल येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही पराभवामागील कारणे स्पष्ट केलीच शिवाय पदाधिकारी व नगरसेवकांच्या कामगिरीचा हिशेब मांडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. दरम्यान, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्या वेळी शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व काही नगरसेवक त्यांच्यासोबत उपस्थित होते.