भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न : शरद पवार

शनिवार, 6 फेब्रुवारी 2016 (10:52 IST)
मुंबई- देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असून, अल्पसंख्याक समाजाबद्दल द्वेष पसरविला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
 
पवार यांनी इतिहासकार, लेखक, विचारवंतांची बैठक आयोजित केली होती. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर या वेळी चर्चा झाली. या वेळी पवार म्हणाले, भावी पिढीला मोडतोड झालेला इतिहास दिला जाऊ नये, त्यांना योग्य तो इतिहास कळावा यासाठी आता इतिहास संशोधकांनी पुढे यायला हवे. हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी इतिहास आणि शालेय अभ्यासक्रमातील बदल देशाच्या एकतेला बाधक आहेत.

वेबदुनिया वर वाचा