पुण्यात गाड्या पेटविणार्‍याचे रेखाचित्र जाहीर

सोमवार, 29 जून 2015 (11:10 IST)
येथील सिंहगड रोडवरील तीन ते चार सोसायट्यांमध्ये अज्ञाताने गाड्या पेटवून दिल्याने खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु केल्या असून सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या संशयित व्यक्तीचे रेखाचित्र जाहीर करण्यात आले आहे. सनसिटी रस्ता परिसरातील काही सोसायट्यांमधील दुचाकी आणि मोटारी जाळण्याचा प्रकार रविवारी घडल्याने नागरिकांच्या मनात अद्याप भीतीचे सावट आहे.

वेबदुनिया वर वाचा