पिस्तूल खोचून ठोकलेले भाषण महाजनांच्या अंगलट?

सोमवार, 30 मार्च 2015 (11:46 IST)
मूकबधीर मुलांसाठी आयोजित कार्यक्रमामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चक्क कमरेला पिस्तूल खोचून भाषण ठोकल्याने खळबळ उडाली आहे.
 
यावरुन विरोधक आक्रमक झाले असून महाजन यांनी राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. अधिवेशनामध्ये या मुद्यावरुन सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
 
दरम्यान, महाजन यांनी या कृत्यामध्ये काहीही गैर नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. स्वसंरक्षणासाठी गेल्या २५ वर्षांपासून मी पिस्तूल  जवळ बाळगतो. याची भीती घालून मी कोणताही गुन्हा केलेला नाही अथवा खंडणीही मागितलेली नाही. काँग्रेसचे सरकारच्या काळात कायदेशीर परवाना घेऊन हे पिस्तूल बाळगत आह, असा खुलासा महाजन यांनी केला आहे.
 
महाजन यांना पोलीस यंत्रणेवरच विश्वास नाही का, असा सवाल करुन राष्ट्रवादीने भाजपा सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

वेबदुनिया वर वाचा