पवारांचा गौप्यस्फोट

मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (11:36 IST)
काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पुढे केले होते
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसताना राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन व्हावे यासाठी काँग्रेसने खटपट सुरू केली होती. यात कदाचित भारतीय जनता पक्षाला रोखण्याचाच विचार असावा, पण ती रचना स्थिर राहू शकली नसती असेही ते म्हणाले. 
 
काल निकाल लागत असतानाच काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर संपर्क साधला आणि शिवसेना सरकार स्थापन करेल आपण म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने त्या सरकारला मदत करावी असे सुचवले. मात्र त्यांच्या त्या प्रस्तावात स्पष्टता नव्हती. काँग्रेसने या आधी राज्य तसेच केंद्रीय स्तरावरही अनेक सरकारांना पाठिंबा दिला होता मात्र त्यांनी पाठिंबा दिलेली सरकारे टिकलेली नाहीत हा इतिहास आहे. त्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या हितासाठीच भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय केल्याचे पवारांनी स्पष्ट केले.
 
शरद पवार म्हणाले की, काँग्रेसचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून 82 आमदार निवडून आलेले आहेत. शिवसेनेची संख्या 62 आहे. म्हणजे तीन्ही पक्षांचे मिळून विधानसभेत 144 एवढेच संख्याबळ झाले असते. (पान पाच पाहा) 
 
एवढय़ा कमी संख्याबळावर हे सरकार कितपत चालेल याची शंका होती. या शिवाय काँग्रेसचा इतिहास अशा रचनेसाठी उत्साहवर्धक नाही हेही ठावूक असल्यामुळे अन्य पर्याय पाहिला. भाजपचे 123 संख्याबळ आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची जोड मिळाल्यास ते संख्याबळ 164 होते व ते स्थिर सरकारसाठी पुरेसे ठरेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
 
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसच्या राज्य पातळीवरच्या एका वरिष्ठ नेत्याचा काल ङ्कतङ्कोजणीची प्रक्रिया सुरू असताना ङ्कला ङ्खोन आला होता. पण त्यात स्पष्टता नव्हती. शिवाय काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी कोणताच संपर्क केला नाही तसेच चर्चा केली नाही. त्यामुळे ङ्कग आम्ही आङ्कचा निर्णय केला आहे. आता हा पा¨ठबा घ्यायचा किंवा कसे याबाबत सङ्कोरच्या पक्षाने ठरवायचे आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या आमदारांची पहिली बैठक नरिमन पॉईंट येथील राष्ट्रवादी भवनात पार पडली. त्यात पक्षाच्या विधिमंडळ नेतृत्वपदी अजित पवारांची निवड झाली. त्या नंतर भाषण करताना अजित पवारांनी पक्षाच्या विधिमंडळ गट प्रमुखपदी आर.आर. पाटील यांच्या नावाची घोषणा स्वत: अजित पवारांनी केली. ते म्हणाले की, विधिमंडळ गटाच्या उपनेतेपदी जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची नेमणूक आपण करतो आहोत. उपस्थित आमदारांनी या दोन्ही नेत्यांच्या निवडीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. शरद पवार तसेच अजित दादांनी मार्गदर्शन करताना आमदारांना सल्ला दिला की विधानसभेत मन लावून व नेटाने काम करायचे आहे. पुढच्या पाच वर्षात पक्ष राज्यात सर्वत्र वाढावा यासाठी मी प्रयत्न करणार असेही अजितदादांनी यावेळी जाहीर केले. दरम्यान, भाजपचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश माथूर यांनी भाजप कार्यालयात बोलताना असे स्पष्ट केले की, भाजपचेच सरकार राज्यात स्थापन होणार आहे. त्याला शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला तर पुढे चर्चा होऊ शकेल. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला बिनशर्त पाठिंबा जरी दिला असला तरी तो आम्ही घ्यायला नको असे माझे स्पष्ट मत आहे. निवडणुकीच्या प्रचारात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच पूर्ण मोहीम चालवली होती. अर्थात शिवसेनेनेही अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. आम्हीही कुणी त्यांच्याशी बोललेलो नाही. या बाबतचे सारे निर्णय दिल्लीतीलच नेते घेतील. आम्हाला इथे तो अधिकार नाही असेही खडसे यांनी स्पष्ट केले. 

वेबदुनिया वर वाचा