नितीन गडकरींचे मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग?

बुधवार, 22 ऑक्टोबर 2014 (13:09 IST)
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेत्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नाव चर्चेत आले आहे.
 
'केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र' अशी घोषणा राज्यभर गाजत असली तरी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र मुख्यमंत्रिपदासाठी नितीन गडकरी यांना पसंत दिल्याने फडणवीस यांचे नाव मागे पडल्याचे चित्र आहे. 
 
केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या गडकरींनी राज्यात येऊन राज्याची धुरा सांभाळावी, ही भाजप नेत्यांची इच्छा असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 
 
मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत शर्यतीत भाजपच्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे आहेत.  याशिवाय, सत्तास्थापनेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी 'शिवसेनेनं विनाअट पाठिंबा द्यावा, नाहीतर राष्ट्रवादीही विनाअट पाठिंबा द्यायला तयार आहे

वेबदुनिया वर वाचा