नाशिकमध्ये चित्रपटगृह मालकाची आत्महत्या

वेबदुनिया

गुरूवार, 10 डिसेंबर 2009 (19:43 IST)
शहरातील प्रसिध्द दामोदर चित्रपटगृहाचे मालक बाळासाहेब चुंबळे (७५) यांनी आज पहाटे आपल्या राहत्या घरी स्वतःला गोळी मारुन घेवून आत्महत्या केली.

चुंबळे हे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे जुने स्नेही होते. आजाराला कंटाळून चुंबळे यांनी आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. नाशिक शहरातील तिडके कॉलनी भागात राहणारे बाळासाहेब चुंबळे यांनी आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास आपल्या सर्व्हिस रिव्हॉलरमधून स्वतःच्या डोक्याला गोळी मारुन घेवून आत्महत्या केली.

चुंबळे यांचे शहरात दामोदर, विजयानंद व मधुकर असे तीन चित्रपटगृह आहेत. त्यापैकी दामोदर चित्रपटगृह प्रसिध्द चित्रपटगृह आहे. चुंबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. चुंबळे हे कुसुमाग्रजांचे जुने स्नेही होते.

वेबदुनिया वर वाचा