नाशकात राष्ट्रवादीला मनसेचा ‘हात’

बुधवार, 25 मार्च 2015 (10:42 IST)
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक.... मनसेचे सर्वाधिक सदस्य... मात्र, मनसेची साथ मिळाल्याने राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे विजयी झाले. मनसेच्या या ‘खेळी’मुळे येथील राजकीय समीकरणेच बदलली आहेत.
 
नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून यामध्ये मनसेचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना - रिपाइंचे तीन, भाजपा व काँग्रेसचे प्रत्येकी दोन व एक अपक्ष सदस्य आहेत. सर्वाधिक पाच सदस्य असतानाही मनसेने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवला नाही.
 
याऊलट मनसेने थेट राष्ट्रवादी पाठिंबा जाहीर केला होता. मंगळवारी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मतदान झाले. यात मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष एकत्र आल्याने राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे सहज निवडून आले.

वेबदुनिया वर वाचा