नवरात्र निमित सप्तशृंगगडावर वाहनांना प्रवेश बंदी

मंगळवार, 27 सप्टेंबर 2016 (14:21 IST)
आराध्य दैवत म्हणून ओळखली जाणारी श्री सप्तशृंगगडावर येत्या नवरात्री निमित्त  दि. १ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. उत्सव काळात राज्यभरातून गडावर गुजरात,महाराष्ट्र या ठिकाणाहून लाखो भाविक येतात. भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने दि. १ ते ११ ऑक्टोबर या काळात खासगी वाहनांना गडावर प्रवेश बंदी केली आहे. याकाळात गडावर जाण्यासाठी भाविकांना  महामंडळाच्या बसेसने प्रवास करावा लागणार आहे. 
 
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट आणि पोलीस व जिल्हा प्रशासनाने यात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गडावर खास नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.तर गडावर येत असलेल्या भाविकांसाठी  आरोग्य, सेवा, पिण्याचे पाणी व वाहतूक व्यवस्था आदींचे नियोजन केले आहे.  भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडले जाणार आहे. भवानी चौकापासून पहिल्या पायरीपर्यंत लोखंडी जाळ्या टाकून भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडले जाईल. यात्रा कालावधीत खासगी वाहने गडावर नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी वाहनांसाठी नांदुरी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांची ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा