'तर मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही'

सोमवार, 30 जून 2014 (17:22 IST)
महाराष्ट्राचे अराद्य दैवत विठठ्लाच्या पूजेचे मंत्र बदलण्याची मागणी करण्‍यात आली आहे. पुजेचे मंत्र न बललल्यास येत्या आषाढीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पूजा करु दिली जाणार नसल्याचा इशारा विठ्ठल रुक्मिणी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांनी दिला आहे.

विठ्ठलाच्या पूजेदरम्यान पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्त म्हटले जाते. मात्र, यामुळे जातीयभेद वाढीस लागत असल्याचे पाटकणर यांनी म्हटले आहे. पुरुष आणि स्त्रीसुक्ताऐवजी तुकोबांचे  गलचरण किंवा माऊलींचे पसायदान म्हटले जावे, अशी मागणी भारत पाटणकर यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा