ड्रेनेजमध्ये गुदमरुन शेतकऱ्यांचा मृत्यू

शनिवार, 25 जून 2016 (17:27 IST)
ड्रेनेजमध्ये गुदमरल्यानं चार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागल्याची घटना शिर्डीत घडली. चेंबरमधल्या विषारी वायूमुळं गुदमरुन या चौघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.ड्रेनेजच्या चेंबरमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी सुरुवातीला एक शेतकरी आत उतरला. बराच वेळ तो बाहेर आला नसल्यानं दुसरा शेतकरी आत गेला. त्यानंतर बराच वेळ हे दोघेही बाहेर न आल्यानं त्यांना पाहण्यासाठी आणखी दोघे चेंबरमध्ये उतरले. या चारही जणांचा मृतदेहच बाहेर काढण्यात आले. सखाराम शिंदे, नवनाथ शेळके, आनंद मोरे आणि मारुती मिंधार अशी या शेतकऱ्यांची नाव आहेत. 

वेबदुनिया वर वाचा