महापालिकेच्या महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी काढले आहेत. विभागिय जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्यांचे पद नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. रामाणे या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेविका दीपा मगदुम आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील यांचाही जातीचा दाखल अवैध ठरल्याने त्यांचेही नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.