एसएमएस करुन विद्यार्थी करणार व्होटींग

शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (11:53 IST)
महाराष्टातील महाविद्यालयांमध्ये बंद पडलेली निवडणुकीची परंपरा पुन्हा सुरु होणार असून निवडणुकीवेळी होणारे वाद, हाणामार्‍या   आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस वरुन व्होटींग करण्याचा पर्याय भाजपा सरकार देणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. 
 
राज्यातील महाविद्यालयांत निवडणूक घेऊन विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती केली जात असे. मात्र, यामध्ये शिरलेले राजकारण आणि वाद, हाणामार्‍यांमुळे  या प्रक्रियेला गालबोट लागले. महाविद्यालयांत अशा प्रकारांनी निवडणुका गाजू लागल्याने ही पध्दतच बंद करण्यात आली होती. मात्र, लोकशाही पध्दतीनेच विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणुक व्हावी, या उद्देशाने पुन्हा निवडणुक पध्दत घेण्याचे धोरण राज्यातील भाजपा सरकारने निश्चित केले आहे. मात्र, यातील गैरप्रकार रोखण्यासाठीही काळजी घेतली जात आहे.
 
याबाबत बोलताना तावडे म्हणाले,  विद्यापीठ, महाविद्यालयातील निवडणुकांची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण केली जाईल. उमेदवारांना  एक नंबर दिला जाईल व मतदानासाठी काही दिवसांचा कालावधी दिला जाईल. त्यांना एसएमएसद्वारे मतदार केले जाईल.    

वेबदुनिया वर वाचा