अशोक चव्हाणांविरुद्धच्या नोटीस हाय कोर्टाकडून स्थगित

मंगळवार, 29 जुलै 2014 (10:59 IST)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नांदेड येथील खासदार अशोक चव्हाण यांना दिल्ली कोर्टाने दिलासा दिला आहे. 2009 मधील विधानसभा निवडणुकीमधील पेड न्यूज प्रकरणी निवडणूक आयोगाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसला दिल्ली हाय कोर्टाने स्थगिती दिली आहे. पेड न्यूजप्रकरणी चव्हाण यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत होती.
 
चव्हाण यांनी 2009 मध्ये भोकरमधून विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु खर्चाचा दिलेला हिशेब योग्य नसल्याने अपात्र घोषित का करण्यात येऊ नये? अशी नोटीस आयोगाने त्यांना बजावली होती. आयोगाच्या नोटिसला चव्हाण यांनी हाय कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर कोर्टाने नोटिस स्थगित केली आहे.  

वेबदुनिया वर वाचा