अनामी रॉय यांची नियुक्ती कॅटकडून रद्द

वेबदुनिया

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2008 (12:59 IST)
ज्येष्ठता लक्षात न घेता सरकारने राज्याच्या पोलिस महासंचालकपदी अनामी रॉय यांची नियुक्ती केल्याचे ताशेरे ओढत त्यांची नियुक्ती रद्द करण्‍याचे आदेश कॅटने (केंद्रीय प्रशासकिय न्यायाधीकरण) दिले आहेत.

या जबाबदार पदावर तीन वरिष्ठांना डावलून रॉय यांची नियुक्ती केलीच कशी असा सवालही कॅटने उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने रॉय यांची नियुक्ती केल्यानंतर महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांनी कॅटमध्ये एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. यावर निर्णय देताना कॅटच्या खंडपीठाने रॉय यांची नियुक्ती रद्द करण्‍याचे आदेश सरकारला दिले आहेत. आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा