तेंलगणमधील एमआयएम पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरला आहे. या पार्श्वभूमीवर ओवेसी हे मुंबईत तळ ठोकून आहेत. भिवंडी आणि नागपाडा भागात ओवेसींनी सभा घेतल्या. विशेष म्हणजे ओवेसी यांचा मुक्काम सध्या नागपाडा परिसरातच आहे. शुक्रवारी आवेसी अरब मशिदीमध्ये नमाज अदा करकेल्यानंतर भव्य रॅलीही काढली.