निर्यात क्षेत्रातील एक कोटी जणांची नोकरी धोक्यात

भारतीय निर्यात मंडळाने केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या आर्थिक पॅकेज बद्दल नाराजी व्यक्त केली असून, जर सरकारने याविषयी गांभीर्याने विचार केला नाही तर या क्षेत्रातील एक कोटी नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

महासंघाचे अध्यक्ष ए शक्तिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 2009 पर्यंत वस्त्र, अलंकार, हस्तशिल्प, अभियांत्रिकी, आणि सेवा क्षेत्रावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढच्या वर्षात देशाच्या निर्यात क्षेत्रात मोठी घसरण होणार असून, याचा फटका प्रत्यक्षरुपात या उद्योगांना बसणार आहे. हे वर्ष देशातील निर्यातदरांसाठी अवघड असल्याचे भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे.

वेबदुनिया वर वाचा