डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरूच

देशातील बाजारात सुरू असलेल्या विक्रीच्या माऱ्याने परकीय गुंतवणूकदारांनी आपला पैसा बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केल्यानंतर बँकिंग बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी घसरला आहे. तीन आठवड्यानंतर रुपयांच्या मूल्यात ही मोठी घसरण मानली जात आहे.

शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असल्याने याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत असल्याचे अर्थमंत्र्यांनीही मान्य केले असून, यासाठी उपाय करण्यात येत असल्याचे त्यांनी भरत आर्थिक संमेलनात स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा