राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा?

शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (13:51 IST)
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, यावेळी राखीचा सण रविवार 22 ऑगस्ट 2021 रोजी असेल.राखी बांधताना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.चला या संदर्भात 2 विशेष मंत्र जाणून घेऊया.
 
1. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वां अभिबन्धामि रक्षे मा चल मा चल।।
 
* जेव्हा बहिण आपल्या भावाला राखी बांधत असेल तेव्हा बहिणीने पश्चिम दिशेकडे मुख करुन भावाच्या कपाळावर कुंकु,चंदन आणि अक्षता याचे तिलक करावे आणि या मंत्राचा जप करावा.
 
* शास्त्रांप्रमाणे रक्षा सूत्र बांधताना उपरोक्त मंत्राचा जप केल्याने अधिक फळ प्राप्ती होते. भावाला पूर्वाभिमुख, पूर्व दिशेकडे बसवावे. बहिणीचं मुख पश्चिम दिशेकडे असावं.
 
* यानंतर भावाच्या कपाळावर तिलक करुन उजव्या हातावर रक्षासूत्र बांधावं. रक्षासूत्र बांधताना या मंत्राचा जप करावा.
 
2. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वां रक्षबन्धामि रक्षे मा चल मा चल ||
 
* जर शिष्य किंवा शिष्या आपल्या गुरुला राखी बांधत असेल तर वरील मंत्र उच्चारण करावं. लक्ष देऊन बघितल्यास या दोन्ही मंत्रांमध्ये अंतर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती