Punjab Exit Poll 2022 : पंजाबमध्ये 'आप'ची सत्ता बनू शकते, 90 जागांची अपेक्षा

सोमवार, 7 मार्च 2022 (19:48 IST)
आम आदमी पार्टी पंजाबमध्ये सरकार स्थापन करेल अशी अपेक्षा आहे.एक्झिट पोलनुसार, 'आप' ला राज्यात 41 टक्के मतांसह 76 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काँग्रेस केवळ 19 ते 31 जागांवर अडकू शकते. केवळ 28 टक्के मतांची टक्केवारी मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय भाजपला 1 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतकेच नाही तर अनेकवेळा राज्यात सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलाला केवळ 7 ते 11 जागा मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. पंजाबमध्ये मोठा बदल होणार असून पहिल्यांदाच 'आप' प्रचंड बहुमताने सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
पंजाबचा एक्झिट पोलनुसार,आम आदमी पक्ष राज्यात 62 ते 70 जागा जिंकू शकतो. त्यामुळे काँग्रेसला केवळ 21 ते 31 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात शिरोमणी अकाली दलालाही 16 ते 24 जागा मिळू शकतात. दरम्यान, एक्झिट पोलबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे वक्तव्य समोर आले आहे. माझा त्यांच्यावर विश्वास नाही, असे ते म्हणाले. निकालासाठी ईव्हीएम उघडेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती