पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पोलिसांचा झिंगाट डान्स

रविवार, 11 सप्टेंबर 2022 (12:02 IST)
यंदा गणेशोत्सव खूप दणक्यात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दोन वर्षाने सर्व सण निर्बंधमुक्त साजरे केले जातात आहे. गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करण्याची संधी भाविकांना मिळाली. 10 दिवसाच्या गणेशोत्सवानंतर अनंतचतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. गणेश विसर्जन देखील दणक्यात योजिले. गणपती विसर्जनाला भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत बाप्पांच्या गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यात लोकांचा उत्साह बघायला मिळाला.

या विसर्जनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सध्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांचे भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या व्हिडीओ मध्ये पोलिसांना सर्व थकवा विसरून मिरवणुकीत डान्स करताना दिसले.सणासुदीला कुठेही अनुचित प्रकार घडू नये. या साठी पोलीस प्रशासन कर्तव्य बजावतात. सणासुदीच्या काळात त्यांना स्वतःसाठी देखील वेळ मिळत नाही. 24 तास कामावर सज्ज असलेल्या या पोलिसांना स्वतःच्या घरातील गणपतींचं दर्शन देखील लाभत नाही.

थकवा जाणवत असून देखील हे आपले कर्तव्य करतात. पुण्यात गणपती मिरवणूकीत पोलिसांनी कार्यकर्त्यांसोबत चांगलाच ठेका धरला होता. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीतील शेवटचं मंडळ असलेल्या महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती बेलबाग चौकातून पुढे गेला. ही मिरवणूक चौकात आली. त्यावेळी 24 तास बंदोबस्तावर तैनात असलेले पोलिस बेभान होऊन मिरवणूकीत नाचले.आपला संपूर्ण थकवा विसरून पोलीस विसर्जनाच्या वेळी गाण्यावर ठेका धरून डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत महिला पोलीस देखील आनंदानं विसर्जन मिरवणुकीत डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओवर त्यांच्यासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती