पुण्यात मांजरीमध्ये बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात ८९९ किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आला आहे. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे.
बनावट पनीर बनवण्यासाठी लागणारे लाखोंचं साहित्यही यावेळी जप्त करण्यात आलंय. असा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केलं आहे. तसेच, त्यासाठी एक टोलफ्री क्रमांकही जारी केला आहे. बनावट आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचं आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात यावी, असं आवाहन केलं आहे.