दसऱ्याच्या दिवशीच 1 कोटींचं सोनं चोरीला गेले

शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (17:47 IST)
एका कामगाराने ऐन दसरा सणाच्या मुहूर्तावर 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांची एवढी जबरी चोरी केल्यानं पिंपरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीची घटना उघडकीस येताच, ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने त्वरित चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत, आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत. 
 
मुकेश तिलोकराम सोलंकी असं गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय कामगाराचं नाव आहे. तो चिखली परिसरातील मोरेवस्तीवरील रहिवासी आहे. पण त्याचं मुळगाव राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आहे. आरोपी सोलंकी हा चिखली येथील श्री महावीर ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून काम करत होता. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीनं दुकानातील तब्बल 1 कोटी 18 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी श्री महावीर ज्वेलर्सचे मालक जितेंद्र अशोक जैन (वय-35, रा. निगडी) यांनी शनिवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती