दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूला दर मिळाला

गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (17:54 IST)
उत्पादनाच्या दृष्टीने हा हंगाम महत्वाचा असतो पण यंदा पावसाने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. मात्र, जोडव्यवसाय म्हणून लागवड केलेल्या पिकांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. गत आठवड्यात मंदिरे उघडल्यापासून फुलांचा बाजार चांगलाच बहरत आहे. यातच उद्या दसरा सण असल्याने झेंडूच्या फुलांची मागणी वाढत आहे. दसरा सणात झेंडूच्या फुलाचे विशेष महत्व आहे. आवक कमी असून आता मागणी वाढल्याने चांगला दरही मिळत आहे. ठोक बाजारात 40 ते 60 रुपये प्रतिकीलो दर मिळत आहे तर किरकोळ बाजारात 80 ते 130 रुपये दर मिळत आहे.
 
प्रतिकूल परस्थितीमध्ये झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण दसरा सणात झेंडूच्या फुलाला विशेष महत्व असते. झेंडूची फुलं घरोघरी सजावटीसाठी वापरली जातात, पूजेसाठी आणली जातात. दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांसह आपट्याच्या पानांना मोठी मागणी असल्याने नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट परिसरात झेंडू, शेवंतीसह आर्टीफिसिअल फुलांची देखील मागणी वाढली असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. हीच परस्थिती इतर शहरांमध्ये देखील पाहवयास मिळत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती