टीव्ही रिपोर्टरच्या निधनानंतर राजेश टोपे यांचा मोठा निर्णय

बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (15:36 IST)
राज्यात कोरोनाची भीषण अवस्था सुरू असताना पत्रकाराच्या मृत्यूनंतर पुण्यात कोरोनासंबंधी व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचं समोर आलं आहे. अथक प्रयत्न करुनही आधी बेड मिळाला नाही आणि नंतर रुग्णवाहिका मिळाली नाही. यामुळे पुण्यात टीव्ही 9 या वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरला आपला जीव गमवावा लागला. यावर आता सर्व परिसरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
शिवसेनेच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या
पत्रकार पांडुरंग रायकर यांना ऑक्सीजन का मिळाला नाही याची तातडीने चौकशी करण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. तर पुण्यासह इतर जिल्ह्यांत अॅम्बुलन्स तसंच ऑक्सीजन कोणत्याही परिस्थतीत उपलब्ध करावे. वेळ पडल्यास भाडेत्त्वावर घ्यावे अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आणखी एका धक्कादायक प्रकारावर भाष्य केलं आहे. लक्षणविरहीत असताना श्रीमंत लोक दबाव वाढवत आय.सी.यूमध्ये भरती करतात याबाबत जिल्हाधिकारी यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे असं राजेश टोपे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती