पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन उठवला : राजेश टोपे

शनिवार, 29 मे 2021 (08:53 IST)
पुणे विभागातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अन्य एका बैठकीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना दिली. त्यावेळी पुण्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तर पॉझिटिव्हिटी रेट अद्याप कमी झालेला नाही, असंही टोपे म्हणाले. महत्वाची बाब म्हणजे पुण्यातील विकेंड लॉकडाऊन उठवण्यात येत असल्याची घोषणाही टोपे यांनी यावेळी केली.

कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यात शनिवारी आणि रविवार फक्त दवाखाने आणि मेडिकल सोडून सर्वकाही बंद ठेवण्यात येत होतं. त्यात किराणा दुकानांसह भाजीपाला विक्रीचाही समावेश होता. मात्र, आता पुण्यातील स्थिती सुधारत आहे. त्यामुळे पुण्यात शनिवार आणि रविवारी सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, त्यासाठीही राज्य सरकारने घालून दिलेली सकाळी 7 ते 11 ही वेळ कायम राहणार असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.

अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार !

पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भातील मागणी आपण आढावा बैठक केली असता, त्यानुसार निर्णय घेतला आहे. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल.

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 28, 2021

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती