भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. बालवाडीत त्यांची सभा होती. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्त्व सोडले आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे गटाची सभा झाली त्यात उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीकास्त्र सोडले ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी अहमदशहा अब्दालीचे राजकीय वंशज पुण्यात आले होते ते अहमद शहा होते हे अमित शहा आहे.
नवाझ शरीफ यांचा केक खाणाऱ्यांकडून हिंदुत्व शिकायचे का? ते म्हणाले की, शिवसेनेने हिंदू धर्म सोडला आहे. आम्ही हिंदू धर्म सोडलेला नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे देशद्रोही हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.