लशींच्या तुडवड्याने केंद्रांवर वादावादीचे प्रकार

शनिवार, 17 जुलै 2021 (08:31 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये आदल्यादिवशी टोकन देणे ठरेल योग्य कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना विविध अडचणींना,समस्यांना सामोरे जावे लागत आहे.लसीकरणासाठी पहाटेपासूनच केंद्रांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. एका केंद्रांवर केवळ 100 लशींचे डोस उपलब्ध असतात.रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याने नागरिक संतप्त होतात अन् अनेकदा वादावादीचे प्रकार घडतात. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांनाही पाचारण करावे लागते. त्यासाठी यमुनानगर केंद्रांवर आदल्यादिवशीच टोकन देण्याची पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे जेवढे टोकन मिळालेत तेवढेच नागरिक रांगेत थांबतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वंच केंद्रांवर ही पद्धत अवंलबण्याची आवश्यकता आहे.
 
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून दुस-यादविशी कोणत्या केंद्रांवर कोणती आणि किती क्षमतेने लस मिळणार याची माहिती आदल्यादिवशी प्रसिद्ध केली जाते. नागरिकांना रांगेत ताटकळत थांबावे लागू नये यासाठी यमुनानगरमधील लसीकरण केंद्रांवर एक चांगला पर्याय काढला आहे.आदल्यादिवशीच सायंकाळी पाच वाजता नागरिकांना टोकन दिले जाते.
 
ज्या नागरिकांना टोकन मिळाले.तेवढेच नागरिक दुस-यादिवशी रांगेत थांबतात.त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतोय आणि लसही मिळत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.शहरातील सर्वच केंद्रांवर ही पद्धत अंवलबण्याची आवश्यकता आहे.जेणेकरुन गोंधळ होणार नाही. नागरिकांना पहाटेपासून रांगेत थांबावे लागणार नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती