पुण्यात भीषण कार अपघात दोन ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे जिल्ह्यात बारामती भिगवण रोडवर जैनीकवाडी गावाजवळ रात्री साडेतीनच्या सुमारास हा भीषण रस्ता अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार झाडाला आदळून हा अपघात झाला. या कार मधून चौघे जण प्रवास करत होते. त्यापैकी मयत झालेले दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. तक्षू शर्मा आणि आदित्य कणसे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. दोघेही 21 वर्षांचे असून बारामती येथील रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेनी पायलटांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या आधी या चौघांनी त्यांच्या खोलीत एक पार्टी केली होती. त्यात त्यांनी मद्यपान केले. नंतर भरधाव वेगात त्यांनी गाडी पळवली आणि एका वळणावर येऊन गाडी अनियंत्रित होऊन वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन एका झाडाला जाऊन आदळले आणि पलटी झाले.