मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा दावा आहे की 19 मे रोजी सकाळी नशेत गाडी चालवणाऱ्या एका मुलाने दुचाकीला धडक दिली होती, परिणामी दोन आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. अन्य आरोपींमध्ये दोन डॉक्टर आणि महाराष्ट्र सरकार संचालित ससून जनरल हॉस्पिटलमधील एक कर्मचारी आणि दोन मध्यस्थांचा समावेश आहे. अपघातानंतर तरुणाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू एम मुधोळकर यांनी पोलिसांना आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात चौकशी करण्याची परवानगी दिली, जिथे ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
या प्रकरणाचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले की, पोलिसांनी सर्व 10 आरोपींची चौकशी करण्यास परवानगी मिळावी यासाठी न्यायालयासमोर याचिका दाखल केली होती. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक व्यवहारांव्यतिरिक्त या प्रकरणात काही नवीन क्लूस आहे ज्यांचा तपास करणे आवश्यक आहे.