अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:26 IST)
म्हातोबाची आळंदी येथील एका 35 वर्षीय महिलेने पतीला फोन करून “मला व प्रणयला शेवटचे बोला, मी निघून चालले” असे म्हणून अडीच वर्षांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
कविता देविदास भोसले (वय 35) आणि प्रणय देविदास भोसले (वय 2.5) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून याप्रकरणी पोलीस नाईक शिवाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
 
याविषयी अधिक माहिती अशी की,10 सप्टेंबर रोजी कविता भोसले हिने पती देविदास भोसले यांना फोन करून ‘मला व प्रणयला शेवटचे बोला मी निघून चालले आहे’ असे सांगितले, त्यानंतर कविताने लहानग्या प्रणयाला कडेवर घेत आळंदी म्हातोबाची येथील एका विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती