मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी लिसांकडून गजाआड

बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:17 IST)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसाकावून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune Crime) विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथक व सर्व्हेलन्स पथकाकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे.पेट्रोलिंग दरम्यान पथकाने महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय चार जणांच्या टोळीला अटक केली आहे.त्यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
 
मनोज काशिनाथ कासले (वय-20), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय-20), बालाजी धनराज कासले (वय-22), शेरली चांदसाहेब शेख (वय-22 सर्व रा.भालकी राज्य कर्नाटक सध्या रा.कस्तुरबा वसाहत औंध,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींना विमानतळ पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात केली.
 
विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील  अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांना विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात चार जण दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी कर्नाटकातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आरोपींकडून विमानतळ पोलीस ठाण्यातील 5, चिखली  आणि येरवडा पोलीस ठाण्यातीलप्रत्येकी एकअसे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.उर्वरित मोबाईल पैकी 2 मोबाईल चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती