असा आहे मनसेचा आगामी रोडमॅप

सोमवार, 18 एप्रिल 2022 (08:29 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मनसेचा आगामी रोडमॅप काय असेल तो स्पष्ट केला आहे. गुढीपाडवा मेळाव्यापासून राज ठाकरे हे संपूर्ण देशभरातच पुन्हा चर्चेत आले आहेत. मशिदींवरील भोंगे उतरविण्याची मुख्य मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम राज यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मशिदींवरील भोंग्यांसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे यापूर्वीच राज यांनी जाहीर केले आहे. काही ठिकाणी त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे. काल त्यांनी पुण्यात येऊन हनुमान मंदिरात आरती केली. आणि आज पत्रकार परिषद घेतली.
 
– येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. त्यादिवशी संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये जाहीर सभा घेणार– येत्या 5 जून रोजी सर्व सहकार्‍यांसोबत अयोध्येला जाणार– ‘एका मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितले की, त्यांचे बाळ लहान असताना त्यांना भोंग्याचा त्रास झाला. त्यांनी स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितला’– भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूंनाच नाही तर मुस्लिमांनाही होतो, हा विषय धार्मिक नाही तर सामाजिक आहे– माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला अन्य पर्याय वापरायला लावू नका
 
– महाराष्ट्राची शांतता भंग करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, पण भोंगे बंद करा– या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा मशिदीवरील भोंगा मोठा आहे का– त्रास होतो तरी तो का सहन करायचा– कायद्यापेक्षा भोंगा मोठा आहे का– कुठलाही धर्म इतरांना त्रास द्या असे सांगत नाही की शिकवित नाही– ३ मे पर्यंत मुदत दिली आ,हे राज्य सरकार योग्य ती कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती