दहावीत 75 टक्‍के गुण मिळाल्‍याने विद्यार्थ्याची आत्‍महत्‍या, चिंचवडची घटना

शुक्रवार, 16 मे 2025 (08:12 IST)
दहावीच्या परीक्षेत मित्रांना जास्त टक्के पडले मात्र स्वतःला 75 टक्के गुण मिळाल्याने नैराश्यात येऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास वाल्हेरकरवाडी चिंचवड येथे घडली आहे. 
ALSO READ: पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी
उमंग रमेश लोंढे वयवर्षे 16 असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मंगळवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर उमंगच्या मित्रांना 80 ते 90 टक्के गुण मिळाले मात्र त्याला फक्त 75 टक्के गुण मिळाले. या मुळे त्याला नैराश्य आले आणि त्याने सकाळी आईला बाबा कामावर सोडायला गेलेले असताना घरी कोणी नसल्याने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ALSO READ: पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडणार, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला कोट्यवधींचा दंड
त्याचे वडील घरी आल्यावर त्यांनी त्याला लटकलेल्या अवस्थेत पहिले . त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेचा तपास चिंचवड पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पुण्यात दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती