पुण्यात कडक निर्बध लागू, घेतले अनेक महत्वपूर्ण निर्णय

शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (16:41 IST)
पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून आता निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत. याबाबत पुण्यात झालेल्या महत्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 
 
बैठकीतीली महत्वाचे निर्णय
 
- जनतेला कमीत कमी त्रास कसा होईल याचा विचार झाला 
- मायक्रो कंटेन्मेंटचे धोरण अधिक कडक करणार 
- होम आयसोलेशन असलेल्या रुग्णाला कंट्रोल रूम गाईड करणार
- स्पेशल ब्लड टेस्ट मोहीम राबवली जाणार आहे 
- हॉस्पिटलमध्ये कमीतकमी कालावधीत रुग्ण बरे करण्यावर भर असेल 
- बिल ऑडिटची कारवाई पुन्हा सुरू करणार 
- प्रायव्हेट हॉस्पिटलमधील तक्रार येण्याच्या आधी हे पाऊल उचलतोय 
- कामगार लोकांची आठवड्यातून एकदा टेस्ट व्हायलाच हवी, यासाठी आवाहन  
- हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सात दिवसासाठी बंद
- पार्सल सेवा मात्र सुरू राहणार आहे 
- सिनेमागृह, धार्मिक स्थळ, पालिकेची सार्वजनिक वाहतूक सात दिवसांसाठी बंद राहणार
- आठवडे बाजार ही सात दिवसांसाठी बंद 
- शहर हद्दीत असलेले बाजार येथे नियमांचे पालन होण्यासाठी पालिका नियोजन करणार
- कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही
- अंत्यसंस्कार, विवाह यातून वगळले आहे ( अंत्यसंस्कार 20, विवाहसाठी 50 लोक उपस्थित राहू शकतील )
- संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पुणे जिल्ह्यात संचारबंदी
- पोलीस प्रशासन कारवाई करणार 
- उद्या पासून सात दिवस पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध
- संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील
- एसटी सेवेत मात्र कुठलेही निर्बंध नाही 
- गार्डन, जिम बाबत जुनेच नियम असणार
 
- नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या तर पोलिसांना अंमलबजावणी करण्यासाठी सोपं असतं.
 
- जास्तीत जास्त स्पीकरवर आवाहन करण्याचा विचार आहे.
- जनप्रबोधन करण्यावर पोलिसांचा भर असेल.
- 30 एप्रिल पर्यंत शाळा कॉलेज बंद राहणार.
- बोर्ड / MPSC च्या परीक्षा मात्र होतील.
- लसीकरण मोहेमेचा वेग स्थानिक पातळीवर होतो.
- मोहिमेला वेग दिला तर लस जास्त उपलब्ध करून देऊ असं केंद्राने कळवलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती