क्रूरता : भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार केले

गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (08:30 IST)
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार केले आहे. पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर इमारतीत ही घटना 12 डिसेंबरला घडली. 
 
पुण्यात भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून दिलंय, हे वृत्त कळाल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री आणि विद्यमान खासदार मनेका गांधींनी पोलिसांना फोन करत, अज्ञाताला अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
थेट मनेक गांधींचा फोन आल्यानंतर पोलिसांनीही तपासाचीही चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खासदार मनेका गांधींनी स्वत: याप्रकरणात लक्ष घातलंय. कुत्र्याला इमारतीवरून फेकणाऱ्या अज्ञाताला तातडीनं अटक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती