आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण करा

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (07:46 IST)
पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत.त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा ‘हॉटस्पॉट’ प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे  निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या.
 
पुणे जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना रूग्णवाढीचा आकडा पुन्हा हजारावर गेल्याने चिंतेचं वातावरण आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भागात प्रभावीपणे उपाययोजना आणि अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण तसंच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक करण्याचं यावेळी सांगण्यात आलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती