पुरावा लागतो, तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करतात : नारायण राणे

मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (08:10 IST)
भाजप नेते नारायण राणे, यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटिशीचे समर्थन केले आहे. राणे म्हणाले, “संजय राऊत एवढी बडबड करतातना, मग जाऊ देना त्यांना ईडीच्या समोर. पुरावे असल्याशिवाय ईडी आणि सीबीआय चौकशी करत नाही. पुरावा लागतो. तेव्हाच ते नोटीस पाठवतात आणि तपास करतात,” अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला. एवढेच नाही, तर भाजप ईडीचा वापर करत नाही. केंद्र सरकारअंतर्गत ईडी आणि सीबीआय आहे, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.
 
पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा ईडी, सीबीआयसारखी हत्यारे वापरावी लागतात. यामुळेच वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईकांना ईडीकडून नोटीसा पाठवण्यात आल्या, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती