पूजा खेडकर प्रकरणात पूजा खेडकरच्या आई वडिलांची वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने पुणे पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश दिले होते. पूजाने UPSC परीक्षेसाठी ओबीसी नॉन क्रिमी लेअरचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या साठी केंद्र सरकारने तिच्या पालकाची सद्य वैवाहिक स्थिती माहिती करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले असून तिच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीचा अहवाल पुणे पोलिसांनी राज्य सरकारला पाठवला असून तो केंद्राला पाठवला जाणार आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे आई-वडील दिलीप आणि मनोरमा खेडकर हे कायदेशीररित्या वेगळे झाले होते.
नियमांनुसार, ओबीसी नॉन-क्रिमी लेयर श्रेणीचा लाभ केवळ अशाच उमेदवारांना मिळू शकतो ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.सध्या तिची आई मनोरमा खेडकर या जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला बंदुकीच्या धाकावर धमकी दिल्याप्रकरणी तुरुंगात आहे.