पुणे मनपाचा कर्मचारी निघाला अट्टल मोबाईल चोर, 2 लांखांचा मुद्देमाल जप्त

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:34 IST)
पुणे महापालिकेतीलआरोग्य विभागातक कर्मचाऱ्याने पुणे शहरातील (विविध भागात मोबाईल चोरी ) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या अट्टल मोबाईल चोराकडून 1 लाख 88 हजार रुपये किंमतीचे 21 मोबाईल जप्त केले आहेत.तानाजी शहाजी रणदिवे (वय-33 रा. शांतीनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये ) मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने मोबाईल चोरांना पकडण्यासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील ) तपास पथक हद्दीत गस्त घालत होते.याच दरम्यान पोलीस अंमलदार सतिश मोरेयांना महावीर गार्डनच्या जवळ मुख्य रस्त्यावर गंगाराम रोड येथे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.त्यावेळी तानाजी हा रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करत असल्याचे दिसून आले.यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली.त्यावेळी त्याच्याजवळ 6 मोबाईल सापडले.यासंदर्भात विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

50 पेक्षा अधिक मोबाईलची चोरी
पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली.त्यावेळी त्याने स्वत: पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे सांगितले.कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केट यार्ड परिसरातून जवळपास 50 पेक्षा अधिक मोबाईलची.चोरी केल्याची कबुली दिली.तसेच चोरीचे काही मोबाईल ओळखीच्या लोकांना विकल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर यांच्या सुचनेप्रामाणे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसकांवकर पोलीस अंमलदार सतिश मोरे, तानाजी सागर,राहुल शेलार,यांनी ही कारवाई केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती