नंदकुमार खैरे यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांनी सहकारनगरमधील एक कार्यालय आरक्षित केले होते. या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचे विधी तसेच एक हजार जणांना भोजन देण्यात येणार होत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे हा विधी होणार नाही. मात्र खैरे यांनी पत्नीच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारा खर्च करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबानेही साथ दिली.