Pune : उत्तर प्रदेशातील एक महिला काही वर्षांपासून पुण्यात राहत आहे. या महिलेने एकाच वेळी तिळ्यांना जन्म दिला असून महिला आणि तिन्ही बाळ सुखरूप आहे. बाळांमध्ये दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या पूर्वी महिलेला तीन मुली आहे. आता महिलेने पुन्हा तिळ्यांना जन्म दिला आहे. मुख्य म्हणजे महिलेने साडे आठ महिन्यात बाळांना जन्म दिला. महिलेला घरातच प्रसूतीकळा सुरु झाल्या असून महिलेने घरीच एका बाळाला जन्म दिला.