Pune : अजितदादा-चंद्रकांत पाटीलांमध्ये शीतयुद्ध, काय आहे हे प्रकरण

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (16:45 IST)
Ajit Pawar vs Chandrakant Patil : सध्या अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात निधीवरून शीतयुद्ध झाल्याची चर्चा आहे. गेल्या 3 महिन्यांपासून 400 कोटी रुपयांच्या विकासकामाला निधी मिळत नसल्याची तक्रार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

सध्या विकासकामे प्रलंबित होत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार चंद्रकांत पाटील दादांना डावलत असल्याचे दिसत आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार यांची नियुक्ती होण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. मात्र भाजपचे काही नेते चंद्रकांत पाटील हेच या पदावर राहण्याची मागणी करत आहे. 

मे महिन्यात पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख  शरद पवार देखील होते.या वेळी 400 कोटी रुपयांच्या विकासकामासाठी मंजुरी दिली होती. 1 जुले रोजी या बैठकीचे इतिवृत्त मंजुरीसाठी जिल्हाप्रशासनाकडे पाठवले. 

2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर हे इतिवृत्त बराच काळापासून जिल्हा प्रशासनाकडे मंजुरी अभावी रखडल्याचे समोर आले आहे. ही कामे अजित पवारांची मंजुरी न मिळाल्यामुळे प्रलंबित असल्याची तक्रार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. पुण्यातील प्रलंबित विकास कामांना निधी मिळत नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटीलांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्रींनीं तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.   
 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती