पुणे : पुण्यात वाढले बांगला देशी घुसखोर, तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

बुधवार, 20 सप्टेंबर 2023 (08:51 IST)
पुणे : पुणे आणि परिसरात विनापरवाना राहणारे बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड येथील मोशी परिसरातील बो-हाडेवाडी येथे राहत असणा-या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी पथकाने अटक केली. काल दुपारी ही कारवाई करण्यात आली. पुण्यात बेकायदेशीर राहणा-या बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
 
सुकांथा सुधीर बागची (२१), नयन बिंदू बागची (२२), सम्राट बलाय बाला (२२, तिघे मूळ रा. बहादूरपूर, पो. दतोकंदवा, जि. मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम, पारपत्र, परकीय नागरिक आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी फिर्याद दिली आहे.
 
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी भागातील बो-हाडेवाडी येथे असणा-या एका बांधकाम साईटवर काही नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या ठिकाणी जाऊन कारवाई केली. त्यात तीन बांगलादेशी नागरिक या ठिकाणी बेकायदेशीर राहात असल्याचे निदर्शनास आले. त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे भारतात वास्तव्यास असलेली कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती