पुणे :- अभी तो मै जवान हू! म्हणत अनेक वयस्कर तारुण्यातील संधी पुन्हा मिळतात का? याची चाचपणी करत असतात. पण बर्याचदा त्यांच्या पदरी निराशाच येते.
असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला. एका कॉल गर्लच्या संपर्कात येणे ७४ वर्षांच्या पुणेकर आजोबांना महागात पडले. तुम्हाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकवू ,अशी धमकी देत आरोपींनी पीडित आजोबांकडून ३ महिन्यांत ३० लाख रुपये उकळले.
पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून हा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी ७४ वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, २ जणांना अटक केली आहे.
पुणेकर ७४ वर्षीय आजोबांनी जुलैमध्ये ज्योती मार्फत एका कॉल गर्लची भेट घेतली होती. त्यानंतर फिर्यादी यांना ज्योतीचा फोन आला. पोलिसांनी "त्या" कॉल गर्लला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.