MPSC च्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (22:16 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुढील वर्षी होणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळा पत्रक जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार. 
 
उमेदवारांना स्पर्धा परीक्षेची तयारी योग्यरितीने करता यावी व परीक्षेचा अंदाज येण्यासाठी एमपीएससी दरवर्षी संभाव्य वेळा पत्रक प्रसिद्ध करते. त्यानुसार वर्ष 2024 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 16 परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी यायाधीश कनिष्ठ स्तर, याय दंडाधिकारी प्रथम वर्गाच्या परीक्षांचा समावेश करणार. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळा पत्रकात परीक्षेचे स्वरूप , जाहिरात कधी प्रसिद्ध झाली तो महिना देखील नमूद केला आहे. हे वेळा पत्रक संभाव्य असून त्यात बदल  होण्याची शक्यता आहे. बदल झाल्यास त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल. अशी माहिती एमपीएससी ने दिली आहे. 
 


Edited by - Priya Dixit    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती