पुण्यातील केशव नगर खराडी जवळील मुठा नदीवरचा हा व्हिडीओ आहे. मुठा नदी जवळ टोलजंग इमारतीवर डासांचे मोठे वादळ दिसत आहे. या वेळी लाखोंच्या प्रमाणात डास एकाच वेळी दिसत आहे. हे लोकांच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये एकाच वेळी सात ते आठ मोठ्या रांगेत घोंगावत दिसत आहे. हे डास कुठून आले आणि कशामुळे आली हे समजू शकले नाही.
या भल्या मोठ्या डासांमुळे पुण्याच्या नागरिकांच्या आरोग्याला हे धोकादायक आहे.
याचा व्हिडीओ एका Maze .Pune या इंस्टाग्राम वरून शेअर करण्यात आला असून या मध्ये नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. काहींनी स्वच्छ पुणे सुंदर पुणे वर कॉमेंट्स केली आहे.