बारावीत शिकणाऱ्या राष्ट्रीय घोडेस्वार विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या

सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (08:29 IST)
राष्ट्रीय स्तरावर घोडेस्वार ठरलेल्या एका मुलीने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारत तिने आत्महत्या केली. पुणे जिल्ह्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड भागात ही घटना घडली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
 
ही मुलगी सध्या इयत्ता बारावीत शिकत होती.अभ्यासातही अत्यंत हुशार होती. मात्र रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणाऱ्या शेजाऱ्यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला.त्यांनी खाली पाहिलं असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी पडली असल्याचं दिसून आलं. त्यांनी तातडीने ही माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली.
 
मिळालेल्या माहितीनुसार मयत विद्यार्थिनी ही अत्यंत गुणी मुलगी होती. तसेच तिच्या घरातील वातावरणही खेळीमेळीचे होते. तिच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची ॲकॅडमी आहे. त्यामध्ये बालपणीपासून ती घोडेस्वारीचे धडे घेत होती. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तिने हॉर्स रायडिंगमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सर्व काही ठीक असताना तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती